
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच उर्वशी विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी ती पूर्ण ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसली होती.

यावेळी उर्वशीने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेससोबत ब्लॅक सनग्लासेस परिधान केले होते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

उर्वशीने आत्तापर्यंत फारश्या चित्रपटात काम केले नसले तरी, सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोअर्सची संख्या खूपच जबरदस्त आहे.

अलीकडे उर्वशीचे इन्स्टाग्रामवर 40 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप पसंत केले जात आहेत.

उर्वशीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात उर्वशीसोबत अभिनेता रणदीप हुड्डा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.