
ऐश्वर्या राय बच्चनने सोमवारी तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्या दरवर्षी तिचा वाढदिवस फक्त कुटुंबासोबत साजरा करते. यावेळीही ऐश्वर्याने तिचा वाढदिवस नेहमीप्रमाणे अभिषेक बच्चन, आराध्या आणि तिच्या आईसोबत साजरा केला. ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाला फुलांचा मुकुट परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

ऐश्वर्यासोबत मुलगी आराध्यानेही फुलांचा मुकुट परिधान केला होता आणि दोघीही सुंदर दिसत होत्या. त्याचवेळी अभिषेकही दोघांसोबत मस्ती करताना दिसला.

ऐश्वर्याने तिच्या आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. कुटुंबासोबतचे फोटो शेअर करण्यासोबतच ऐश्वर्याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी अनेक धन्यवाद.

ऐश्वर्याच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 2018 साली रिलीज झालेल्या फन्ने खान या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत राजकुमार राव आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

आता ऐश्वर्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे. हा मणिरत्नम निर्मित भारतीय तमिळ चित्रपट आहे.