
अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) हिने ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अद्यापही अलाया इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करु शकलेली नाही.

बॉलिवूडमध्ये स्वतःची तगडी ओळख नसलेली अभिनेत्री अलाया तिच्या ग्लॅमरस लूकमुळे मात्र कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
