
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्याऐवजी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्यानं बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नाही मात्र तरी तिचे फॅन फॉलोइंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीत.

नव्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पोस्ट करताच व्हायरल होत असतात.

नव्यानं तिची बेस्ट फ्रेंड खुशी कपूरसोबत एक सुंदर पार्टी केली होती. ज्या पार्टीचे फोटो आता तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये नव्या खुशीला मिठी मारताना दिसत आहे.

खुशी आणि नव्याचे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. खुशीनं नव्याच्या पोस्टवर हार्ट इमोजीसह कमेंट केली आहे.

फोटोंमध्ये नव्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.