
अनन्या पांडे तिच्या उत्तम चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असून तिच्या इंटरनेटवरील, सो पॉजिटिव या उपक्रमामुळेदेखील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. अभिनेत्री ग्लोबल सिटीजन कॉन्सर्टमध्ये भाग घेणारी सर्वात तरुण भारतीय व्यक्ती आहे.

हा कॉन्सर्ट 24 तास चालणारा म्यूजिक फेस्टिवल आहे, जो पृथ्वीचे संरक्षण, गरिबी, जलवायु परिवर्तन, दुष्काळ अशा अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालतो, त्यासाठी कार्यवाही करण्याचे आह्वान करतो.

या महोत्सवात, अनन्या पांडेने जलवायु परिवर्तनामुळे विलुप्त होणाऱ्या प्रजाती, समाजातील अत्यधिक गरीबीवर भाष्य केले असून 'आपल्या ग्रहाचे रक्षण करा, गरीबीचा पराभव करा' असा संदेश दिला आहे.

सर्वात तरुण भारतीय व्यक्ती होण्यासोबतच, या संगीत कार्यक्रमात या वैश्विक मंचावर पाऊल ठेवून आपल्या यादीत आणखी एक मनाचा तुरा जोडला आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील 'सो पोजिटिव्ह' या उपक्रमासोबत अभूतपूर्व काम करते आहे.

वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाल्यास अनन्या पांडेकडे तीन बिग बजेट चित्रपट आहेत. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत शकुन बत्रा दिग्दर्शित एक अनटाइटल्ड चित्रपट, विजय देवरकोंडासोबत 'लायगर' आणि याव्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत 'खो गए हम कहां' आहेत.