
बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडला. बिग बॉसच्या या सिझन अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी चर्चेत राहिली.

अंकिता लोखंडे टॉप 4 मध्ये होती. मात्र ती विजयी होऊ शकली नाही. बिग बॉसच्या घरातील काही खास फोटो अंकिताने शेअर केलेत.

बिग बॉसच्या घरातील ही शेवटची रात्र होती, असं म्हणत अंकिताने हे फोटो शेअर केलेत. अंकिताच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिलीय.

तू खूप चांगलं खेळलीस. तुझा आम्हाला अभिमान आहे. जरी ट्रॉफी मिळाली नसली. तरी आमच्यासाठी तू विजेतीच आहे, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी मात्र अंकिताला ट्रोल केलं आहे. Jealousy queen... काय तोंड करते रे बाबा... ओव्हर कॉन्फिडन्ट मुलगी, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.