
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नापूर्वी अंकिता लोखंडेने मंगळवारी एक बॅचलर पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये तिने मैत्रिणींसोबत खूप धमाल केली होती.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. रिपोर्ट्सनुसार दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.

जेव्हा अंकिताला लग्नाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने याबाबत फारसे काही सांगितले नाही. मात्र, मंगळवारी तिची बॅचलर पार्टी होती.

बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अंकिताने पर्पल कलरचा ड्रेस परिधान केला होता. यासोबतच तिने ब्राइड टू बी केकही कापला.

अंकिताच्या बॅचलर पार्टीला तिच्या अनेक मैत्रिणींनी हजेरी लावली होती, ज्यात अनेक टीव्ही अभिनेत्री होत्या. मृणाल ठाकूर, अभिज्ञा भावे, अमृता खानविलकर देखील पार्टीत पोहोचल्या होत्या.