
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) आता पती-पत्नी बनले आहेत. दोघांनी मुंबईत कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये सात फेरे घेतले. दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन मंगळवारी विवाहबंधनात अडकले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता दोघेही पती-पत्नी बनले आहेत.

लग्नानंतर अंकिता लोखंडेने तिचे विकीसोबतचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसोबतच सेलेब्स देखील दोघांच्या फोटोंवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

लग्नात अंकिताने गोल्डन हेवी लेहेंगा परिधान केला होता. तर, विकीने व्हाईट आणि गोल्डन कलरची शेरवानी परिधान केली होती. दोघेही एकत्र परफेक्ट दिसत होते.

फोटोंमध्ये अंकिता आणि विकीच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद सर्वांना स्पष्ट दिसत आहे. अंकितानेही लग्नात ग्रँड एन्ट्री केली होती. अंकिता जेव्हा मंडपामध्ये पोहोचली, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

ही छायाचित्रे शेअर करताना अंकिताने लिहिले की, ‘प्रेम म्हणजे संयम असतो, आमच्यासाठी हे खास सरप्राईज आहे. आम्ही आता अधिकृतपणे मिस्टर आणि मिसेस जैन झालो आहोत.’