
‘बिग बॉस मराठी’ चा हा सीझन सतत चर्चेत असतो. या सीझनमधील टास्कही चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. आज घरात लगोरीचा खेळ खेळला जाणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये चांगलीच लढत होणार आहे. अंकिता आणि वर्षा यांच्यामध्ये खेचाखेची होणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.

अंकिता आणि वर्षा यांच्यामधील धरपकड प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या रंगतदार टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे आज पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी समोर आलेल्या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये मानाची ट्रॉफी पटकावण्यासाठी आजपासून चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. आपल्या खेळाबद्दल सदस्य एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत.