
बॉलिवडू आणि क्रिकेटविश्वात नेहमी चर्चेत राहणारी जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. हे दोन्ही कपल नेहमी चर्चेत असतात. त्यांचे फोटो देखील नेहमी व्हायरल होतात. अलीकडेच अनुष्का शर्मानं तिच्या इंस्टाग्रामवर पती विराट कोहलीसोबतच्या क्वालिटी टाइमचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो अभिनेत्रीने यूकेमध्ये सुरू असलेल्या तिच्या चित्रपटाच्या शूटमधून काढला आहे.

हे दोघेही नेहमी चर्चे असतात. त्यांचे फोटो देखील नेहमी व्हायरल होतात. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्रीचे तिचा देखणा पती विराट कोहलीसोबतचे काही रोमँटिक आणि सुंदर फोटो समोर आले आहेत.

नुकतंच अनुष्का शर्मानं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती विराटसोबत कॉफी डेट एन्जॉय करताना दिसत आहे. दोघांची कूल स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

यादरम्यान अनुष्काचा नो मेकअप लूक चाहत्यांना आवडला आहे. त्याचबरोबर पॉवर कपल असल्याने त्यांची लव्हस्टोरीच्या चर्चाही चाहत्यांना आवडतात.

फोटोंमध्ये दोघेही आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून थंडीत बसून एकमेकांच्या या सुंदर क्षणांचा आनंद घेत आहेत. ते एकमेकांशी बोलताना आणि हसताना दिसतायत.