
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणारं जोडपं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. हे दोघे पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी हे दोघे उपस्थित होते.यावेळी त्यांना स्पॉट केलं गेलं.

मुंबईतील अंधेरीमधल्या यशराज स्टुडिओत गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दोघे एकत्र पहायला मिळाले. यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता तर अर्जुनने काळ्या रंगाचा टि-शर्ट घातला होता.

हे दोघे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होते.

मलायला अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी अनेकांना भावते. मलायका आणि अर्जुन यांच्यात 12 वर्षांचं अंतर आहे. पण या दोघांच्या प्रेमासमोर वयातलं अंतर फिकं आहे.