बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रिया सेन हिचा जन्म 24 जानेवारी 1981 रोजी झाला. यावर्षी रिया तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रिया सेन फिल्मी बॅकग्राऊंडशी संबंधित आहे. तिची आजी सुचित्रा सेन, आई मूनमून सेन आणि बहीण रायमा सेन याही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होत्या. त्यामुळे रियाच्या घरातच अभिनयाचे वातावरण होते. (फोटो सौजन्य : गूगल)

रिया सेनने वयाच्या 10 व्या वर्षी 'विषकन्या' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 1991 मध्ये आलेल्या या चित्रपटात रियाने बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी रियाने फाल्गुनी पाठकच्या 'याद पिया की आने लगी' या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. या म्युझिक व्हिडिओमुळे रियाला ओळख मिळाली आणि मॉडेल म्हणून तिची ओळख झाली. यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये दिसली. (फोटो सौजन्य : गूगल)

रिया सेनची फिल्म कारकीर्द फारशी चांगली नव्हती. तिने अनेक चित्रपटात काम केले पण नायिका म्हणून ती कधीच छाप पाडू शकली नाही. रियाला पहिले व्यावसायिक यश 2001 मध्ये कॉमेडी चित्रपट 'स्टाइल'मध्ये मिळाले. यानंतर रिया अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ज्यामध्ये हिंग्लिश, झंकार बीट्स, शादी नं. 1, अपना सपना मनी मनी आणि मल्याळम चित्रपट अनंतभद्रम यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : गूगल)

2017 मध्ये रियाने फोटोग्राफर शिवम तिवारीसोबत गुपचूप लग्न केले. या लग्नाची माहिती रियाने इंस्टाग्रामवर दिली. रियाच्या अचानक लग्नानंतर रिया लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि गुपचूप लग्न केले. रियाने बॉलिवूडमध्ये जवळपास 30 चित्रपट केले आहेत. (फोटो सौजन्य : गूगल)