
भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर अभिनेत्री मोनालिसा अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करताना दिसते. सध्या मोनालिसा तिच्या व्हेकेशनमुळे चर्चेत आहे.

सध्या मोनालिसा तिचा पती विक्रांत सिंह राजपूतसोबत मालदीवमध्ये धमाल करत आहे.

अशात आता मोनालिसा सतत तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या स्टाईलचे ग्लॅमरस फोटो शेअर करत आहे.

नुकतंच मोनालिसानं तिच्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती नाश्त्याचा आनंद घेताना दिसत आहे.

फोटोंमध्ये विक्रांत शर्टलेस स्टाईलमध्ये तर मोनालिसा स्वतः निळ्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

मोनालिसाची ही स्टाईल चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.