
'बिग बॉस मराठी' या यंदाचा सिझन चांगलाच गाजला. 'बिग बॉस मराठी' चा सिझन संपल्यानंतरही स्पर्धकांची जोरदार चर्चा होत असते. या रिअॅलिटी शोमधील भावाबहिणीच्या जोडी भाऊबीज साजरी केली.

कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर ही धनंजय पोवारच्या घरी गेली होती. तेव्हा त्यांनी भाऊबीज साजरी केली. 'भाऊबीज प्रक्रिया संपन्न', असं म्हणत डीपीने अंकितासोबतच फोटो शेअर केलेत.

अंकिता आणि डीपीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अंकिता आणि डीपीदादा असंच एकमेकांवर बहीण भावाचे प्रेम राहू द्या... दिवाळीच्या शुभेच्छा!, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

अंकिता आणि डीपीच्या या फोटोंवरून नेटकऱ्यांना सूरज चव्हाणची आठवण आली आहे. सुरजला नाही ओवळणार का? गरीब आहे म्हणून?, असा प्रश्न एका नेटकऱ्याने अंकिताला केला आहे. तुम्ही सगळे सूरजकडे किती दुर्लक्ष करता, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाण आणि अंकिता या दोघांमध्येही बहिण भावाप्रमाणे प्रेम आहे, बिग बॉसच्या घरात ते दिसलं आहे. पण भाऊबीजेला त्या न ओवाळळ्याने नेटकऱ्यांनी अंकिताला प्रश्न केले आहेत.