
'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज ठरला आहे. पण अभिनेत्री निक्की देखील दमदार स्पर्धक म्हणून चर्चेत राहिली. शोमुळे निक्तीच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

सोशल मीडिया स्टार आणि निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिधनमधील सर्वात महागडी स्पर्धक ठरली.

मीडिया रिपोर्टनुसार, निक्की हिच्या बिग बॉसमधून होणाऱ्या दहा आठवड्यांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला जवळपास 37 लाख 50 हजार रुपये मिळालं आहे.

निक्की प्रचंड रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्री तिच्या आई - वडिलांसोबत आलिशान घरात राहते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री घराचे फोटो पोस्ट करत असते.

निक्की बिग बॉसच्या घरात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. पण अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबत तिची केमिस्ट्री अनेकांना आवडली.