
1967 साली ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटात तनुजा यांच्या सोबत देव आनंद मुख्य भूमिकेत होते ज्यात तनुजा यांनी ज्वेलरच्या मुलीची भूमिका साकारली होती. तनुजा या चित्रपटातील ‘रात अकेली है’ या गाण्यातही दिसली जे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.

‘हाथी मेरे साथी’ 1971 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट माणूस आणि हत्ती यांच्यातील बंधाबद्दल दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात तनुजा यांनी राजेश खन्ना यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तनुजा यांच्या कामाचं खूप कौतुक झालं.

‘जीने की राह’ हा तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक होता जो 1953 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात एका विवाहित पुरुषाची कथा होती जो नोकरी शोधण्यासाठी शहरात जातो. हे पात्र जितेंद्र यांनी साकारलं आहे. त्यांना नोकरी मिळते, पण एका अटीवर की ते अविवाहित आहेत. जितेंद्र नोकरीसाठी खोटं बोलतात आणि त्यानंतर काय होतं ते खूप मजेदार आहे.

बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘अनुभव’ या चित्रपटात तनुजासोबत संजीव कुमार आणि दिनेश ठाकूर मुख्य भूमिकेत होते. तनुजा यांनी या चित्रपटात एक प्रायोगिक भूमिका केली. ‘मेरी जान मुझे जान ना कहो’, ‘कोई चुपके से आके और मेरा दिल जो मेरा होता’ या चित्रपटातील त्यांची गाणी बरीच लोकप्रिय झाली.

1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डोर चोर’ चित्रपटात धर्मेंद्र, तनुजा, शोभना समर्थ, के एन सिंह आणि जलाल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील तनुजाचं काम चांगलेच आवडलं. हा देखील तनुजाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता.