
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हुमा एका बोल्ड अवतारात दिसते आहे. तिनं ब्लॅक कलरचा सुंदर ड्रेस कॅरी केला आहे.

या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. ब्लॅक शॉर्ट स्कर्ट आणि टॉपमध्ये हुमाचा हा अवतारात ती अधिकच ग्लॅमरस दिसतेय. सोनी लिव्हच्या ‘महाराणी’ या वेब सीरिजमध्ये हुमा झळकली आहे.

महाराणीमध्ये राणी भारतीची भूमिका साकारणारी हुमा कुरेशी नेहमीपेक्षा वेगळी दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना हुमानं कॅप्शनमध्ये लिहिलं- बॅक टू ब्लॅक. काही तासांतच हे फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरले आहेत.

हुमा कुरेशीच्या वेब सिरीजबद्दल बोलायचं झालं तर या सिरीजला खूप चांगले रिव्ह्यूज मिळाले आहेत. यातील हुमाचे वैशिष्ट्य म्हणजे एका अशिक्षित महिलेची, जी चुकून राज्याची मुख्यमंत्री बनते अशा व्यक्तीची भूमिका साकारली आहे.