
अभिनेते धर्मेंद्र यांचा आज 87 वा वाढदिवस आहे. धर्मेंद्र यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव काल रात्रीपासूनच सुरू आहे. धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केलीये.

हेमा मालिनी यांनी पती धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. यामध्ये हेमा मालिनी यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत.

धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोमध्ये धर्मेंद्र हे केक कट करताना दिसत आहेत.

सनी देओल याने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी आणि धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय.

बॉबी देओल याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये बॉबी देओल, धर्मेंद्र आणि सनी देओलचा मुलगा दिसत आहे. यामध्ये ते वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.