
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विशेष म्हणजे किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे नुकताच ट्रेलर रिलीज झाले असून हे ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडले देखील आहे. या चित्रपटातील सलमान खान याच्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

ट्रेलर लाॅन्चच्या वेळी बोलताना सलमान खान म्हणाला की, हा चित्रपट फ्लाॅप गेल्यातर सर्व बिल माझ्यावरच फाटणार आहे. म्हणजेच कुठेतरी सलमान खान याला देखील चित्रपट फ्लाॅप जाण्याची भिती वाटत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट देखील बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी सलमान खान याने बाॅलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लाॅप जाण्याचे थेट कारण सांगून टाकले होते. आता चाहते सलमान खान याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.