
काल रात्री उशिरा विकी कौशल आणि कतरिना कैफ फरहान अख्तरच्या घरी दिसले. फरहानने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी हे दोघे आले होते. यावेळी फरहानच्या घरात जाण्यापूर्वी त्यांनी फोटो काढले.

कतरिनाने फुलांचा ऑफ-शोल्डर शॉर्ट ड्रेस घातला होता. त्यावरव तिने हिल सॅन्डेलही घातला होता. तर विकीने गडद डेनिम्स आणि स्नीकर्सवर पांढरा शर्ट घातला होता.

या दोघांशिवाय करण जोहर, झोया अख्तर, फराह खान, श्वेता बच्चन, डॉली सिधवानी, डिनो मोरिया, चंकी पांडे आणि इतरही काही कलाकार मंडळी फरहानच्या घरी आली होती.

विकीने नुकतच सारा अली खानसोबत लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याच्याकडे मेघना गुलजारचा 'साम बहादूर', भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणीसोबतचा 'गोविंदा नाम मेरा', आदित्य धरचा 'द इमॉर्टल अश्वत्थामा' आणि करण जोहरचा 'तख्त' असे प्रोजेक्ट आहेत.

कतरिना लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3'या सिनेमामध्ये दिसणार आहे. लग्नानंतर बऱ्याचदा हे दोघे एकत्र स्पॉट केले जातात.