
फिल्म स्टार्सची फॅशन नेहमीच उत्तम असते. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने ही आता तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्रिती कमालीची सुंदर दिसत आहे. क्रितीनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती ग्लॅमरस अवतारात दिसली आहे. तिनं न्यूड कलरचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

क्रितीनं या फोटोंमध्ये न्यूड रंगाच्या पेन्सिल स्कर्टसह क्रोचेट टॉप परिधान केलेलं दिसत आहे. तिनं अनेक चांगल्या पोझेस दिल्या आहेत.

क्रिती सेनॉनने आपल्या केसांना वेवी स्टाईल दिली आहे. फोटोंमध्ये ती खिडकीजवळ उभी असल्याचे दिसत आहे.

पंकज त्रिपाठीसोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन 'मिमी' चित्रपटात दिसणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. खुद्द क्रिती सेनॉनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.