
अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

आता मलायका हिने फक्त स्वतःचे नाहीतर, तिच्या गर्ल गँगसोबत फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

मलायका हिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा देखील दिसत आहे. आधी देखील त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

फोटो पाहून नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 'आता म्हाताऱ्या दिसतात..' अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली. तर करिश्मा हिच्या सौंदर्याचं अनेकांनी कौतुक केलं.

मलायका, अमृता, करीना, करिश्मा गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.