
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' या वेबसिरिजची सध्या प्रचंड चर्चा होतेय. या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री मनिषा कोयराला हिने मल्लिकाजान हे पात्र साकारलं आहे.

'हिरामंडी' च्या शुटिंगबाबत मनिषा कोयराला बोलती झाली. तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिने तिचा अनुभव शेअर केलाय.

मी कधी विचारच केला नव्हता की कॅन्सर आणि 50 वर्षांची झाल्यानंतर माझ्या जीवनाचा दुसरा टप्पा सुरु होईल. हा दुसरा टप्पा अशा प्रकारे गाजेल, असं मनिषा कोयराला म्हणाली.

कधी आपल्याला वाटतं, की आपला करिअरचा काळ निघून गेलाय. तो वयाने असेल किंवा मग आजारपणामुळे असेल. पण तुम्ही कधी हार मानू नका. तुम्हाला माहितीही नसतं की पुढे तुमच्यासाठी काय वाढून ठेवलंय, असं मनिषाने म्हटलं आहे.

कॅन्सरमधून सावरतानाच हिरामंडीच्या शुटिंगसाठी 12 तास अस्वच्छ पाण्यात भिजले अन् 53 व्या वर्षी मी पुन्हा उभी राहिले. मी सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभारी आहे. 50 वर्षे खूप चांगली होती, असं मनिषा म्हणाली आहे.