
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मिस युनिव्हर्स इंडियाचा खिताब जिंकल्यानंतर नेहानं अभिनय विश्वात प्रवेश केला. आज नेहा तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला तिच्या नेट वर्थबद्दल सांगतोय.

नेहानं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्हीच्या दुनियेतून केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नेहानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात कयामत: सिटी अंडर थ्रेट या चित्रपटातून केली. यानंतर ती ज्युली चित्रपटात दिसली आणि यामुळे तिला ओळख मिळाली.

नेहा धुपियाची नेट वर्थ : Trendcelebsnow च्या अहवालानुसार, नेहा धुपिया सुमारे 37 कोटींच्या मालमत्तेची मालक आहे. नेहाची बहुतेक कमाई चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून येते. याशिवाय तिनं पॅनासोनिक, गीतांजली ग्रुप, मोबाईल सारख्या अनेक ब्रॅण्ड्सचं समर्थन केलं आहे.

नेहाला बॉलिवूडमध्ये हवे ते स्थान मिळवता आलं नाही. तिनं हिंदीसह पंजाबी, तेलगू, मल्याळम अशा अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं एक चालीस की लोकल, चुप चुप के, हेलिकॉप्टर ईला, हिंदी मीडियम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

याशिवाय नेहा BFF विथ Vogue टॉक शो होस्ट करते. ज्यामध्ये ती बॉलिवूड सेलेब्सशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलते. याशिवाय नेहा एमटीव्ही रोडीज या रिअॅलिटी शोला जज करते.

नेहा धुपियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद आणि नेहानं लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. अंगद आणि नेहानं लग्नाबद्दल कोणालाही कळू दिलं नाही. दोघांना एक मुलगी मेहर आहे. आता नेहा दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या दुसऱ्या गर्भधारणेविषयी माहिती दिली होती.