
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये रेखा 'आयफा अवॉर्ड 2024' मध्ये डान्स करताना दिसत आहे.

रेखा 'आयफा अवॉर्ड 2024' मध्ये अनेक सेलिब्रिटींना परफॉर्म केलं. पण चर्चा सर्वत्र रेखा यांच्या डान्सची रंगली आहे. रेखा 'आयफा अवॉर्ड 2024' सोहळा अबू धाबी याठिकाणी पार पडला.

रेखा यांनी त्यांच्या सर्व 90 च्या दशकातील गाण्यांवर डान्स केला. फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सांगायचं झालं तर, रेखा यांनी 150 डान्सर्स सोबत परफॉर्म केलं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रेखा यांनी तब्बल 22 मिनिटं परफॉर्म केलं.

वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा यांनी दमदार डान्स केला. शिवाय त्यांच्या सौंदर्याने देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र रेखा यांच्या डान्स आणि सौंदर्याची चर्चा रंगली आहे.