
अभिनेत्री संजीदा शेख हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

संजीदा शेख कायम सोशल मीडियावर स्वःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

पांढरा पारंपरिक ड्रेस, नॅचरल मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये संजीदा शेख हिचं सौंदर्य फुलू दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक करत आहेत.

रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी संजीदा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

संजीदा शेख हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे.