
अभिनेत्री सारा अली खान हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात राज्य निर्माण केलं.

पण आता सारा कोणत्या सिनेमामुळे नाही तर, काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सारा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोमध्ये अभिनेत्री सानिध्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये 'A piece of peace' असं लिहिलं आहे.

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

साराचा स्वभाव देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांसोबत देखील अभिनेत्री फोटो आणि सेल्फी क्लिक करत असते.