
अभिनेत्री सोनाली बेंद्र हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

सोनाली हिचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

एक काळ असा होता जेव्हा सोनालीने दमदार अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सोनालीचे सिनेमे आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.