
पहिल्या दोन फोटोमध्ये सोनाक्षी - झहीर खास पोज देताना दिसत आहेत. पहिल्या फोटोमध्ये झहीर याने अभिनेता शाहरुख खान याची सिग्नेचर पोज दिली आहे. तर तोच फोटो सोनाक्षीच्या फोनचा वॉलपेपर देखील आहे...

तिसऱ्या आणि चौथ्या फोटोमध्ये हिरोईन तिच्या आयुष्यातील बेस्ट रोलसाठी तयार होत आहे.. असं सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. शिवाय फोटोंमध्ये झहीर विनोद करत सोनाक्षीला हसवताना दिसत आहे.

पाचव्या फोटोमध्ये सोनाक्षी आणि झहीर व्हॉईज नोट ऐकताना दिसत आहे. जो अभिनेता शाहरुख खान याने पाठवला आहे. कारण झहीर हा शाहरुख खानचा फार मोठा चाहता आहे.

सहाव्या आणि सातव्या फोटोमध्ये नवी नवरी, नवऱ्या मुलाआधी तयार झालेली दिसत आहे. तर सातव्या फोटोमध्ये स्वतःला सिंदूर लावलेलं पाहून सोनाक्षी भावूक झाली आहे.

आठव्या फोटोमध्ये नवरी तयार असल्याने, ती दुरूनच नवऱ्या मुलाची प्रशंसा करायला गेली, जो अजूनही तयार झाला नव्हता... असं फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली.

नवव्या आणि दाहव्या फोटोमध्ये सोनाक्षी हिने नव्या घराची एक झलक दाखवली आहे. जो सोनाक्षी - झहीर यांनी मिळून तयार करण्याचं स्वप्न पाहिलं आहे.