
विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट सरदार उधम OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी रात्री चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. जिथे अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले.

चित्रपट निर्माते शशांक खेतानही स्क्रीनिंगला पोहोचले. त्यांनी मास्क घातलेला दिसला.

सिद्धार्थ मल्होत्रा विकी कौशलच्या सरदार उधम या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला. तो कॅज्युअल लुकमध्ये दिसला.

कियारा अडवाणी पारंपरिक अवतारात दिसली. तिने निळ्या रंगाचा सूट घातला होता. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती.

स्क्रीनिंगवेळी सर्वांच्या नजरा कतरिना कैफवर होत्या. तिचा लूक सर्वांना आवडत आहे. तिने फोटोग्राफर्ससाठी पोजही दिल्या.