
अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता काजोल पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

दरम्यान, काजोलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द काजोल हिने क्लासी ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.