
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आनंदात आहे. आलिया आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट बाॅक्स आॅफिस धमाकेदार कामगिरी करतोय. पहिल्याच दिवशी चित्रपटाने जगभरातून 75 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर आलिया भट्टने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांचे आभार मानले होते.

यंदाचे हे वर्ष आलियासाठी अत्यंत लक्की ठरल्याचे दिसते आहे. यंदा गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआरनंतर आता ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवलीय.

Netflix वर प्रदर्शित झालेला आलिया भट्टचा चित्रपट डार्लिंग्स यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलांय. यामुळे सध्या आलिया आनंदात आहे.

ब्रह्मास्त्र हा आलियाच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. अयान मुखर्जी, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईमध्येसोबत दिसले.