
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या प्रचंड चर्चेत आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. कियारा आणि सिद्धार्थ दोघेही प्रोफेशनल लाईफपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत असतात.

नुकतेच कियारा आणि सिद्धार्थ एकत्र स्पॉट झाले आहेत. रविवारी 31 जुलै रोजी अभिनेत्री कियारा अडवाणीने तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला.

कियारा आणि सिद्धार्थ दोघेही वाढदिवसानिमित्त दुबईला गेले होते. सिद्धार्थ मल्होत्राने दुबईमध्ये कियाराचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने कियारा अडवाणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शेरशाह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा रिलेशनशिपमध्ये आल्याचे बोलले जाते. मात्र, सिद्धार्थ आणि कियारा यांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलेले नाहीयं.