
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ प्रेक्षकांना रोज नव्या वळणांनी आश्चर्यचकित करत आहे. श्री आणि अगस्त्यच्या लग्नानंतर शुभ्राची मत्सराने भरलेली खेळी सुरू आहे.

श्रीला घरच्यांच्या नजरेतून खाली उतरवण्यासाठी शुभ्राने पुन्हा एक नवा डाव खेळला आहे. अलीकडच्या भागात, श्रीने विशालला गिफ्ट दिलं आहे. त्यातही शुभ्राने चालाकी करत ट्विस्ट आणला आहे.

शुभ्राने आपल्या धूर्तपणाचा वापर करून त्या गिफ्टमध्ये स्वतःचे आणि अगस्त्यचे पूर्वी ठरलेल्या लग्नाचे फोटो ठेवले. हे फोटो पाहून विशाल संतापतो आणि भावनेच्या भरात फोटो जाळून टाकतो. परंतु, शुभ्राला नेमकं हेच हवं होतं. या सगळ्याचा संशय श्रीवर यावा यासाठी शुभ्राने ही खेळी खेळली.

'अबीर गुलाल' मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. श्रीने दिलेल्या गिफ्टमधून शुभ्राचं नवं कारस्थान उघड होणार आहे. तसंच श्रीच्या सांगण्यावरून शुभ्रा अगस्त्यला भाऊबीजेला ओवाळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

श्री या कारस्थानांचा कसा सामना करणार? घरच्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवणार? हे आता‘अबीर गुलाल’च्या पुढच्या भागा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शुभाच्या नव्या कारस्थानाला श्री काय उत्तर देणार हे देखील पाहावं लागणार आहे.