
भारतात अनेक तफायफ महिलांचा इतिहास आहे. तर काही महिलांनी हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. तवायफांचं आयुष्य कला, नृत्य, गायन शिक्षण आणि रियाज करणं या तीन गोष्टींभोवती फिरत असायचं.

तवायफांच्या आयुष्यात कला, नृत्य, गायनाला महत्त्वाचं स्थान होतंच, पण शिक्षणासाठी देखील महत्त्वपूर्ण स्थान होतं. लहाणपणी कोठ्यांवर येणाऱ्या मुलींना 3 विषयांमध्ये प्राविण्य दिलं जायचं.

नवीन आलेल्या मुलींनी विविध नृत्य शैली आणि गायनाचं शिक्षण दिलं जायचं. अनेक तास मुली नृत्य आणि गायनाचा रियाज करायचे. शिवाय मुलींना उर्दू शायरी देखील शिवली जायची.

तवायफांच्या आयुष्यात मुजरा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पहिला मुजरा झाल्यानंतर तवायफांवर बोली लावली जायची. त्यानंतर जो नवाब सर्वात जास्त बोली लावेल त्याच्या सेवेत महिला दाखल असायची.

'हीरामंडी' मध्ये सीरिजमध्ये दिग्दर्शक संजय लिला भान्साळी यांनी तवायफांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. पण प्रत्येक तवायफ महिलेचं आयुष्य सारखं नव्हतं.