
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. माधुरीचे फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. पुन्हा एकदा माधुरी एथनिक लूकमध्ये दिसली आहे.

माधुरीने या फोटोशूटमध्ये ब्लॅक कलरची साडी नेसलेली दिसते आहे. या फोटोंमध्ये माधुरी प्रचंड सुंदर दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिचा क्लासिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

या साडीवर माधुरीने हलका मेकअप केला आहे, या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे.

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘बेटा’, ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्यानंतर ती अनिल कपूरसोबत ‘तेजाब’ या चित्रपटात देखील दिसली होती. या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. तेव्हापासून माधुरी एक स्टार बनली.