
सगळीकडे सध्या धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने चमकदार बॉडीकॉन ड्रेस आणि डायमंड ब्रेसलेट आणि फिंगर रिंग घातलेली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

क्रिस्टलने हाय हील्स घालत स्टायलिश पोझ दिली आहे. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे, 'बाहर और अंदर तूफान'. आता नेटकरी या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत.

अनेक नेटकरी तिला हॉर्ट इमोजी पाठवत आहेत. एकाने लिहिले की, "तू खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेस." दुसऱ्याने लिहिले, "वाह, तू खूप सुंदर दिसतेस." अनेकांना तिचा हा लूक आकर्षक वाटत आहे.

धुरंधर या सुपरहिट चित्रपटातील शरत गाण्यात क्रिस्टल डिसूझाने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यातील तिच्या डान्स मूव्हजचे खूप कौतुक होत आहे. बिग बॉस 17 फेम आयेशा खान देखील या गाण्यात आहे.

क्रिस्टल डिसूझाने 2007 च्या टीव्ही शो "कहेन ना कहें" मधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने "क्या दिल में है," "कस्तुरी," आणि "किस देश में है मेरा दिल" या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.