
नोरा फतेही, बॉलिवूड इंडस्ट्रीची दिवा म्हणून ओळखली जाते, तिच्या सुपर सिझलिंग स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ती कायम चर्चेत असते. नोराच्या जबरदस्त ड्रेसमधील तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

आता नुकतंच, नोराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिचे काही अतिशय चित्तथरारक फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

नोरा फतेही प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या सहकार्याने तिच्या पहिल्या फॅशन चित्रपटाचा भाग बनली आहे. नोराने तिच्या शूटमधील बीटीएस व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

नोरा या फोटोंमध्ये अप्सरेपेक्षा कमी दिसत नाहीये. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.

सोशल मीडियावर हे फोटो धुमाकूळ घालत आहेत. चाहते तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.