
पंकज आणि मृदुला यांची भेट 1993 मध्ये त्यांच्या बहिणीच्या लग्नात झाली होती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, ‘माझ्या बहिणीचे लग्न होत होतं आणि मी मृदुलाला बाल्कनीत पाहिलं आणि मला वाटले की मला माझं आयुष्य या महिलेबरोबर घालवायचं आहे. त्यावेळी ती कोण होती, तिचं नाव काय हे मला काहीच माहीत नव्हते.’

12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पंकज आणि मृदुला यांनी 2004 मध्ये लग्न केलं. बऱ्याच अडचणींनंतर दोघांचं लग्न झालं. पूर्वी दोघांचे कुटुंब लग्नाच्या विरोधात होते.

त्या वेळी पंकज यांनी अरेंज मॅरेज आणि हुंडा घेण्यास मनाई केली होती आणि त्यांच्या गावात हे प्रथमच घडलं होतं. पंकज मृदुलाला भेटले तेव्हा ती कोलकात्यात राहत होती आणि दिल्लीत शिक्षण घेत होती. पंकज म्हणाले होते, त्यावेळी डेटिंग सामान्य नव्हती आणि भेटीही सोप्या नव्हत्या. आम्ही पत्रांद्वारे आम्ही बोलायचो किंवा 10 दिवसात फोन यायचा. आमची वेळ रात्री 8 वाजता निश्चित करण्यात आली होती.

एवढेच नाही तर पंकज यांच्या संघर्षाच्या काळातही मृदुला त्यांच्यासोबत होती. त्यांच्या कारकिर्दीतील चढ -उतारात ती नेहमीच त्याचा आधार ठरली आहे.

पंकज यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटच्या वेळी मिमी या चित्रपटात दिसले होते. त्यांच्या चित्रपटातील कामाचं खूप कौतुक झालं आहे. पंकज यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ते 83, बच्चन पांडे, ओह माय गॉड 2 मध्ये दिसणार आहेत.