
राम गोपाल वर्मा केवळ दक्षिण सिनेमातीलच नाही तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्याच्या चित्रपटांचं कोट्यावधी लोकांना वेड आहे.

राम यांनी इंडस्ट्रीमध्ये थ्रिलर आणि क्राइम फिल्मचं वेड लावलं. त्यांचे चित्रपट वास्तववादी आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी अनेकदा चित्रपटांमध्ये नवीन अभिनेत्रींना संधी दिली आहे. नुकतंच त्यांचे एका अभिनेत्रीबरोबर जिममधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

यामध्ये राम गोपाल वर्मा तिला व्यायाम करण्यास मदत करत आहेत.

या अभिनेत्रीचं नाव आहे एरियाना ग्लोरी. एरियाना ही एक अभिनेत्री आणि अँकर आहे. ती तेलुगू बिग बॉस 4 मध्ये दिसली होती.

नुकतंच एरियाना ग्लोरीनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये ती राम गोपाल वर्मासोबत दिसली आहे.