
आज कामिका एकादशी आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते. कामिका एकादशी सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानली जाते.

या एकादशी निमित्त पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास करण्यात आली.

विविध रंगाच्या फुलांनी मंदिस सजवण्यात आलं आहे. तसेच सोळखांबी येथे आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे...

एवढंच नाही तर मंदिरावर फुलांनी ‘आई साहेब’ असं लिहिण्यात आलं आहे. हे नयनरम्य क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील कामिका एकादशीसाठी पंढरपुरात भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.