
अभिनेत्री श्रृती मराठे दरवर्षी मिरवणुकीत ढोल वाजवताना दिसते. यंदाही ती मिरवणुकीत ढोल वाजवताना दिसली. नथ,चंद्रकोरीच्या आकाराची टिकली, अन् ढोल अश्या तिच्या पेहरावाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

अभिनेता आस्ताद काळेही कलावंत पथकात ढोलवादन करतो. मिरवणुकीदरम्यानचा त्याचा हा फोटो...

अभिनेता सौरभ गोखलेही दरवर्षी मिरवणुकीत सहभागी होतो. या पथकात सौरभ ताशा वाजवतो.

सिद्धार्थ जाधवही या पथकात सहभागी झाला होता. सिद्धार्थ आणि सौरभचा हा एक फोटो

अभिनेत्री तेजस्विनी पंडितही ढोलवादन करते. तिची टिपलेली एक भावमुद्रा...

श्रृती मराठे आणि तेजस्विनी पंडित यांचा मिरवणुकी दरम्यानचा एक खास फोटो...