AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: प्रतिक्षा संपली! 8व्या वेतन आयोगाची साईट लाँच, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं इथं पाहा…

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मनातील अनेक संभ्रम दूर होतील. तसेच त्यांना नवीन वेतन आयोगाची खडान खडा माहिती मिळेल. त्यासाठी केंद्र सरकारने मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. काय आहे ती अपडेट?

8th Pay Commission: प्रतिक्षा संपली! 8व्या वेतन आयोगाची साईट लाँच, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं इथं पाहा...
8 वा वेतन आयोगImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 08, 2026 | 10:14 AM
Share

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे. तर इतर कर्मचारी सुद्धा या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. सरकारने आता 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची (8th Central Pay Commission) अधिकृत वेबसाईट, संकेतस्थळ लाँच करण्यात आले आहे. साईट लाँच झाल्यानंतर 8 व्या वेतन आयोगाने सरकारी मंत्रालय, कर्मचारी आणि सहभागीदार यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. वेतन आयोगाची साईट MyGov पोर्टलसोबतही जोडल्या गेली आहे. आता कर्मचारी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया, सूचना आयोगाला देऊ शकतात.

वेतन आयोगाला द्या माहिती

वेतन आयोगाने आपल्या नवीन वेबसाईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला चांगली माहिती देण्यासाठी तुमचे विचार, सूचना आणि इतर माहिती शेअर करा. हे इनपुट MyGov.in च्या वेब पोर्टलर एक 18 प्रश्नावलीतून व्यवस्थितरित्या मागवण्यात येत आहेत. इथं तुम्हाला जर काही माहिती द्यायची असेल तर ती त्वरीत देता येईल.

वेतन आयोगाने या पोस्टमध्ये विविध मंत्रालये, विविध विभाग, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील सरकारी कर्मचारी, केंद्र शासित प्रदेशातील कर्मचारी, न्यायीक अधिकारी, न्यायपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नियामक आयोगाचे सदस्य, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, संशोधनकर्ते यांच्याकडून या प्रश्नावलीवर सूचना आणि माहिती मागवली आहे.

8व्या वेतन आयोगाची वेबसाईट इथं पाहा

8 व्या वेतन आयोगाची अधिकृ वेबसाईट, संकेतस्थळ तयार करण्यात आले असून ते लाईव्ह आहे. आयोगाने हे संकेतस्थळ लाँच केले आहे. वेतन आयोगाची साईट 8cpc.gov.in अशी आहे. या साईटवर गेल्यावर सध्या काय कामकाज सुरू आहे. कोण अध्यक्ष, सदस्य आहेत याची माहिती मिळते. वेतन आयोगाची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर आहे.

केंद्रीय वेतन आयोगाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील सरकारी कर्मचारी, न्यायपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नियामक आयोगाचे सदस्य, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, संशोधनकर्ते यांच्यांकडून 18 प्रश्नांच्या प्रश्नावलीवर त्यांची मतं मागवली आहे. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी अथवा संशोधक असाल तरीही तुम्हाला तुमचे मत मांडता येईल. विशेष म्हणजे तुम्ही जे मत मांडाल अथवा जी काही माहिती द्याल ती गोपनीय ठेवण्यात येईल. पण तुमचे काही मत आणि विचार, सूचना द्यायच्या असतील त्या बिनधास्त द्या. त्यामुळे भविष्यातील तुमच्या वेतनासंबंधीच्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील.

Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल