AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’मुळे रातोरात ही कंपनी मालामाल; तब्बल 167 टक्क्यांनी वाढला नफा

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे एका कंपनीचा मोठा नफा झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमतही चांगली वाढली आहे. धुरंधरमुळे या कंपनीचा नफा कसा झाला, त्याबद्दल जाणून घ्या..

'धुरंधर'मुळे रातोरात ही कंपनी मालामाल; तब्बल 167 टक्क्यांनी वाढला नफा
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2026 | 10:27 AM
Share

मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्सने डिसेंबर तिमाहीत (Q3FY26) दमदार कामगिरी केली आहे. या कंपनीचा एकत्रित नफा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 167 टक्क्यांनी वाढून 96 कोटी रुपये झाला आहे. चित्रपटांचा व्यवसाय पुन्हा एकदा जोर धरतोय, हे या आकड्यांतून स्पष्ट होतंय. दमदार चित्रपटांमुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरकडे वळत आहेत. त्यामुळे मल्टीप्लेक्स चेनचा बिझनेस तितक्याच जोमाने होऊ लागला आहे. पीव्हीआर आयनॉक्स कंपनीचे शेअर्स गेल्या आठवड्यात 986.40 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या नफ्यात ‘धुरंधर’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मोठा वाटा आहे. या चित्रपटाने देशभरात तब्बल 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच याचा दुसरा भागसुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंपनीची कमाई

डिसेंबर तिमाहीत पीव्हीआर आयनॉक्सचा कामकाजातून महसूल 1880 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 1717 कोटींपेक्षा 9.4 टक्क्यांनी जास्त आहे. ही वाढ ‘धुरंधर’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे झाली आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. धुरंधरसारख्या दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटांमुळे कंपनीच्या कामगिरीला चालना मिळाली आहे.

पीव्हीआर आयनॉक्सने म्हटलंय की 2025 हे वर्ष हिंदी बॉक्स ऑफिससाठी आतापर्यंतचं सर्वोत्तम वर्ष होतं. या काळात हिंदी चित्रपटांचं एकूण उत्पन्न 5,500 कोटींपेक्षा जास्त झालं. 2025 या वर्षात चित्रपटांच्या शैलीतील मिश्रण अधिक संतुलित होतं आणि प्रदर्शनाचं वेळापत्रकसुद्धा पूर्वीपेक्षा अधिक नियमित होतं, असं कंपनीने म्हटलंय. काही चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना थिएटर्सकडे आकर्षित केलं, ज्यामुळे एकूणच या व्यवसायाला मोठा फायदा झाला आहे.

एकंदरीत 2025 मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवरील महसूल हा 13,395 कोटी रुपये होता, जो कोरोना महामारीच्या आधीपेक्षी 32 टक्क्यांनी वाढला आहे. 2025 या वर्षांत 37 चित्रपटांनी कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. बॉक्स ऑफिस आणि चित्रपटसृष्टीसाठी हे सकारात्मक संकेत आहेत. डिसेंबर तिमाहीसाठी कंपनीचा EBITDA 662 कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा 16 टक्क्यांनी वाढला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीतील बरीच समीकरणं बदलली आहेत. 19 मार्च रोजी या चित्रपटाचा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या भागाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले जातील, अशी अपेक्षा आहे.

Follow Us
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...