
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा आज शाही थाटात दिल्ली येथे साखरपुडा पार पडत आहे. सायंकाळी 5 वाजता समारंभ सुरू होणार आहे. या साखपुड्याला बाॅलिवूडपासून ते राजकिय नेत्यांपर्यंत अनेकजण हजेरी लावणार आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी 150 लोक उपस्थित राहणार आहेत. बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा देखील दिल्लीमध्ये दाखल झालीये. थोड्याच वेळात हा समारंभ सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे साखरपुड्यामध्ये खाण्याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. धमाकेदार पध्दतीचे जेवणाचे आयोजन साखरपुड्यात करण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार या साखरपुड्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून फूड मेनूमध्ये अत्यंत स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे भारतीय पदार्थांपासून विदेशी पदार्थांचा या फूड मेनूमध्ये समावेश आहे. कबाबपासून ते व्हेगनपर्यंत सगळी व्यवस्था ही करण्यात आली आहे. फास्ट फूडचा देखील यामध्ये समावेश आहे.