
‘नागिन’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री सुरभी चंदनाला आता कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

सुरभी तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच सुरभिने तिच्या ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

‘नागिन 5’मध्ये बानीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह राहिली आहे. अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकत असते.

अलीकडेच सुरभीने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सुरभीने टू-पिस आऊटफिट परिधान केला होता.

सुरभीची खास स्टाईल चाहत्यांना आवडत आहे. हे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत.

‘इश्कबाज’ या मालिकेतून सुरभी चंदनाला टीव्ही जगतात ओळख मिळाली. याशिवाय अभिनेत्री 'कुबूल है', 'संजीवनी' सारख्या बर्याच शोमध्ये दिसली आहे.