
बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) याची पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahuja) 50 वर्षांची झाली आहे. 15 जून रोजी गोविंदाने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपली मुलं टीना (Tina) आणि यशवर्धन (yashvardhan) यांच्यासमवेत भव्य पार्टी आयोजित केली होती. अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor) आणि गायक उदित नारायणही अभिनेत्याच्या घरी या पार्टीत पोहोचले होते.

कुटुंबीयांनी या पार्टीत भरपूर फोटोशूट केले आहे. गोविंदानेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत.

टीना आहुजा तिची आई सुनिता आहुजासोबत खूपच सुंदर दिसत होती.

गोविंदा आणि सुनिता यांचा मुलगा यशवर्धन आहुजानेही आईबरोबर एक सुंदर फोटो काढला आहे.

गोविंदाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरील या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. त्याचवेळी अभिनेता राजपाल यादव देखील या पार्टीत सामील झाला होता.