
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची मोहक आणि बबली अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखसाठी (Genelia D'Souza) आजचा दिवस (5 ऑगस्ट) खूप खास आहे. आज जेनेलियाचा वाढदिवस आहे. जेनेलिया डिसूझाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून पदार्पण केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखसोबत जेनेलिया डिसूझाचे विवाह झाला आहे. दोघे बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

जेनेलिया डिसूझाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. घरात जेनेलियाला जीनू नावाने हाक मारली जाते.

जेनेलिया डिसूझाने प्रामुख्याने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जेनेलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत 'पार्कर पेन'च्या जाहिरातीत झळकली होती.

या जाहिरातीत जेनेलियाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यानंतर जेनेलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

'तुझे मेरी कसम' या चित्रपटात जेनेलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जेनेलियाला रितेश फारसा आवडला नव्हता.

पण नंतर रितेशने जेनेलियाला प्रेमात पाडलेच आणि दोघांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर त्यांनी लग्न केले.

'जाने तू या जाने ना' हा जेनेलियाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो, ज्यात जेनेलियाने 'अदिती'ची भूमिका साकारली होती.