
Happy Birthday Kartik Aaryan | ‘धमाका बॉय’ कार्तिक आर्यनने फॅन्ससोबत साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो...

कार्तिक आर्यनने त्याच्या वाढदिवसानिमित्त मीडियाच्या प्रतिनिधींना भेटून त्याचा वाढदिवस त्यांच्यासोबत साजरा केला. त्याने फोटोग्राफर्ससोबत बराच वेळ घालवला.

बर्थडे सेलिब्रेशनमध्ये कार्तिक खूप खुश दिसत होता. त्याने हिरव्या रंगाचे जॅकेट घातले होते.

कार्तिकच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धमाका चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात तो न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसला आहे.

कार्तिकने कापलेल्या केकवर 'हॅपी बर्थडे धमाका बॉय' असे लिहिले होते. कार्तिकने केकचा तो भाग फोटोशूट करून घेतला. कार्तिक सध्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'भूल भुलैया 2' हा त्याच्या आगामी चित्रपटांपैकी एक बिग बजेट चित्रपट आहे.