Happy Birthday Naga Chaitanya | पहिल्या वाढदिवसाआधीच झाला आई-वडिलांचा घटस्फोट, जाणून घ्या अभिनेता नागा चैतन्यविषयी…

| Updated on: Nov 22, 2021 | 4:37 PM

चैतन्यला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा 'फिल्मफेअर पुरस्कार' देण्यात आला. यानंतर नागा चैतन्यने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या दमदार अभिनयाने तो या चित्रपटानंतर यशाच्या शिखरावर आहे.

1 / 5
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. तो सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांचा मुलगा आहे. नागा चैतन्य 23 नोव्हेंबरला त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. चैतन्यची दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा चित्रपट प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

2 / 5
नागा चैतन्य याचा जन्म 23 नोव्हेंबर 1986 रोजी चेन्नई येथे प्रसिद्ध अभिनेते अक्किनेनी नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती यांच्या घरी झाला. तथापि, चैतन्यच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी नागार्जुन आणि लक्ष्मी वेगळे झाले. चैतन्य याचे संगोपन वडील नागार्जुन आणि सावत्र आई अमला यांनी केले.

3 / 5
शालेय जीवनात तो शाळेच्या बँडमध्ये कीबोर्ड आणि गिटार वाजवायचा. त्यानंतर त्याला कीबोर्ड प्रशिक्षणासाठी लंडनमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. चेन्नईमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि बी.कॉम.ची पदवी पूर्ण करून तो हैदराबादला परतला.

4 / 5
पदवीच्या दुसऱ्या वर्षात, नागा चैतन्यने त्याचे वडील नागार्जुन यांच्याकडे अभिनयात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. चैतन्यला अभिनयाचा वारसा लाभला आहे. त्याने 2009 साली वासू वर्मा दिग्दर्शित 'जोश' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका केली होती. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

5 / 5